मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ८४.

१६८९ कार्तिक वद्य ११.

चिरंजीव राजश्री राय यांसि :-
रघुनाथ बाजीराव आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. मौजे साकोरें, पो माणिकपुंज, हा गांव राजश्री त्रिंबक सूर्याजी यांजकडे आहे. तो त्याकडे चालवावा, येविसीचा करार सालमजकुरीं सन समान सितैनांत झालाच आहे. तर, आपलेजवळ मानिलेचे गांवाविसीं कोण्ही घालमेल करील, तर त्याचें न ऐकावें. मारनिलेकडेच सुदामत चालत आल्याप्रों सुरळित चाले तें करावें. राजश्री चिंतामण हरि मौजेमजकुरास उपद्रव करितात. त्यास ताकीद करावी. रा। छ २४ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries