मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                 पत्रांक ४५. 

इ. स. १७६७ आक्टोबर                                                     श्री.                                                    आश्विन वद्य प्रारंभ शके १६८९

राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसी
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्नो माहादजी शिंदे दंडवत. विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष आपण पत्रें पाठविलीं तीं पावलीं व राजश्री बाळाजीपंत यांस वर्तमान लिहिलें तें त्यांनी निवेदन केलें. सारांश, आपण दोन पत्रें व एक श्रीमंतास व एक पत्र बापूंस आणविलें त्याजप्रमाणें पत्रें पाठविलीं आहेत. तीं पत्रें त्यांस प्रविष्ट करून जें बोलणें तें आपण बोलावें. मुख्य आमचें आपलें बोलणें जाहलें, त्यांत दुसरा अर्थ नाहीं. आपण लिहिल्याप्रों यावयाची तरतूद करून दक्षणेस प्रस्थान केलें आहे; परंतु लोकाच्या देण्याचा पेंच भारी, तीन वर्षांचें देणें, यांजकरितां गवगवा बहुत जाहाला आहे. येथील निर्गम करून लौकरच येतों. आपण तेथील अर्थ पक्का करून उत्तर लौकर पाठवावें. वरकड वर्तमान बाळाजीपंत लिहितील त्याजवरून कळेल. *तुमचें व आमचें बोलनें जालें होते त्या बोलन्याचा अर्थ व येथील अर्थ कितेक प्रकारचा अर्थ सर्व लिहिला, बाळाजीपंत याजला सांगितला. ( स ? )विस्तर कळेल. मधी कितीक लिहितील व सांगतील तो चित्तांत न आनावा. आमचें व तुमचें बोलनें जें जालें तेंच आहे तेंच प्रमान आहे. तरतुदी (म्ही ?) सरकारचा (सरदारीचा?) बंदोबस्त करून घ्यावा दुसरा अर्थ नसे. ज्यानें आमची स्थिति राही ते करावें. बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries