मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                 पत्रांक ४६. *

इ. स. १७६७ आक्टोबर ८.                                                  श्री.                                                    अश्विन वद्य १ शके १६८९

राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसिः-
अखंडित-लक्षुमी-अलंकृत-राजमान्य श्रे॥ माहादजी सिंदे दंडवत विनंति उपरि. पत्रें आपनाकडून बाळाजीपंत यास आलीं तें वर्तमान त्यांनी सांगितलें त्यावरून कळलें. ‘रा। गंगोबातात्यांनीं सर्व सरदारीचें निमित्य आपनाकडे आनून श्रीमंत रा। रावसाहेबास समजाविलें. तो आर्थ त्याच्या ध्यानांत होता. परंतु आपल्या त्याच्या भेटीनंतर चित्तांतील किंतु दूर जाला. परंतु ते वरचेवर समजावितात. एनकरून संषय जात नाही. आह्माविसी श्रीमंताचे व आपलें बोलने होऊन निच्चय आह्माकडी (ल) लक्षाचा जाहला. परंतु दुसरा आर्थ समजावितात याजमुळें अंतर पडतं. याजकरितां आत्मसंतोषानं, (१) दूरदेशीनं, वर्तन् (क) करुन आप्रमानिकत न ये तें करावें ह्मनून आपन बाळाजीपंताचे पत्रीं लि॥ त्याजवरून त्यांनीं सर्व आर्थ सांगितला. ऐसास आमचें बोलनें एकच आहे. दु(स)रा अर्थ नाहीं. जाते समई आपलें आमचें भाषन जालें त्याच निश्चयावर आह्मीं आहों. दरमियान कितेक गोष्टी निर्मान जाहल्या होत्या त्यांची दखल खातरजमा शपतपूर्वक बाळाजीपंत याजपासीं केली. त्यांनी सविस्तर आर्थ आपनास लि॥ आहे. मुख्य आमचा निच्चय हाच कीं त्याजउपरि जें करनें तें आपल्या लक्षानें करावें. ऐसा मजकूर आहे. त्यांनी दाहा लक्ष नजर द्यावी आनी दाहादस्त (,बंदोबस्त ?) कराव. त्या(स?) सरदारींतील आर्थ ऐवज कसी आहे हे सर्व तुह्मास उमजलाच आहे. त्यांसी (हीं ?) मधें लोकांच्या देन्यापासून मुक्त होण्याचें संकट, तेथें दुसरा प्रकार कोठून ? याजउपर एथील निर्गम करून स्वारीस जावयाचे तरतूद आहे. घडे तें खरें. कां कीं सेर आणाल्या (?) ऐवज घेऊन दिला; परंतु निकाल पडत नाहीं त्यामुळें मुल(ख)गिरी व देसची नजर देणें हे घडनें कठिन आहे. यांत पुढें म(ज)कूर कोनता करून सरदारी राखे तोच पडला आहे. पुढें काय तें लि॥ श्रीमंताच्या चित्तांतील संषय जाय तें करनें, याजकरितां पूर्वी लि॥ आहे. रा। बाळाजीपंत आमचे लक्षानंच वर्तनू(क) करितात. बहुत काय लि॥ हे विनंति

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries