मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

१ बाळा जामदार याणें पेशजीं शपथ दिल्ही कीं तुम्हांस अंतर देणार नाहीं या प्रों शफत दिल्ही असतां नानाकडे जाऊन राहिला मिति अश्वीन शु।। १२ शके १७३८ तेव्हांपासून जामदारीचें काम त्रिंबका शिंदा यास सांगितले.
१ वडिलोपार्जित वतने व इनाम गांव व घरें गावोगावीं आहेत तीं उभयतांची निमे निम

१ कसबे पैठण येथे
      १ कुलकर्णे नीम
      १ घर बंदिस्त
      २ खुल्या जागा
    ----
     ४

१ मौजे पंथेवाडी येथें
       १ श्रीदेवीचें देवालय
       १ विहिर
       १ कुळकर्ण दरोबस्त
    -----
      ३

१ मौजे जुवाठी ता। सौदळ
      १ मौजेंमा।र हा गांव इनाम पाच भावांस खोतीसुद्धा
      १ वाडा घर राहावयाचें
     ---
     २

१ कसबें राजापूर येथें वखार दुकानें
१ बाग उन्हाळें
१ बाग गिरे येथें
१ मौजे कोतवडें ता। रत्नागिरी येथें खाजण

१ मौजे घोटी पा। भोंसे येथे
      १ वाडी
      १ पागा
      १ मिराशी जमीन घेऊन विहिर नवीन पाडून बाग केला.
     ----
      ३

१ मौजे पाटेठाण ता। सांडस येथें
     १ शिवालय जीर्णोद्धार केला तें
     १ घर वाडा व पागा
    --
    २

१ मोजे गोवर्धन येथें वाडा

१ सिंगबें येथें
       १ पागा
       १ पाटीलकी भाऊबंदसुद्धां समाईक
      ---
       २

१ शहर जुन्नर येथें जागा अजिदाबाद पेठ येथे आहे
१ सौनापूर येथें पागा ।
१ कसबे तळेगांव येथे जागा

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries