मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

कि॥ कलम माहादजी पाटिलावर
सटवोजी भोसलियाने गुल केली ते समयी
आपले आगावरील बस्ता नेल्या ह्मणोन
माहादजी पाटले विदित केले बिता॥

होन                         तरवार    १
११ पा।                     कोचकी   १
॥ नि॥                     सेला      १
-----------
११॥               पासोडी तांबडी  १

कुडकिया देखील मोते कि॥ होन पा।
१९ ए॥ जोडा १

यापैकी सटवोजी भोसले कबूल जाले
ते माहादजी पाटळेलास देविले तरवार १
कोचकी १ सेला १

बाकी नामुकरद

होन                          कुडकिया जोड
११ पा।                       देखील मोतें      १
॥ नि ॥                     पासोडी तांबडी   १
---------
११॥

यास निर्वाह माहादजी पाटिलावर गुल
जाली ते समयी माहादजी पाटेलाचे
आगावर पासोडी होती की नव्हती याची
साक्ष व कुडकिया मोते कानी होती की
नव्हती व मोते कानी कोठे केली ते किमत
व नख्त होन पा अकरा व नि॥ प्रताप
माहदजीजवळ होते की नव्हते ऐसी
सदर्हूची गोहीसाक्षीनसी बरी चौकस
मनास आणोन माहालिहून सिकियनसी
बखेर हुजूर पाठवणे सदर्हू कलमास
ग्वाहीसाक्ष मनास फाणाल ते ऐसी मनास
आणने की सदर्हू कलमाचा निर्वाह होय
आण बदलामी न ये ऐसी परनिस्ट साक्ष
मनास आणोन हुजून लिहिणे एकूण
कलम १

कि॥ कलम माहादजी पा। याचे
सटवोजी भोसलियाने नेले ह्मणोन विदित
केले

कडबा मौजे कोणेगव्हाण व का। मसूर
ए॥ सुमार बारा हजार १२०००

तुरीचे कुटाची व बाजे हरजिनसी कूट
व लदई एक १

शाकर घराचा पाउसाळियाचा भारे सुमार
२०० का। मसूरपैकी यास सटवोजी
भोसले याला विचारिता ह्मणो लागले की
सातपाचशे कडबा नेला असेल वरचील
नेले नाही ह्मणोन तकरीर केली यासि
निर्वाह देशाधिकारी व पापत्यगार यास
आज्ञापत्र लिहिणे की सदर्हूमधे सटवोजी
भोसले याणी काय नेले असेल ते देसमुख
देसकुळकर्णी व मौजे मजकूरचे वतनदार
याचे गाहीसाक्षीनसी बरे चौकस
सफतपूर्वक मनास आणोन हुजूर लिहिणे
सदर्हू कलमास ग्वाहीसाक्ष मनास आणाल
ते ऐसी मनास आणने की सदर्हू कलमाचा
निर्वाह होय आणि बदलामी न ये ऐसी
परनिस्ट साक्ष मनास आणोन हुजूर लिहिणे

ए॥ कलम १

लग .......................................... ०

लग .......................................... ०

लग .......................................... ०

लग .......................................... ०

लग .......................................... ०

लग .......................................... ०

लग .......................................... ०

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries