मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

सताजी पाटील मौजे सिवडे व मौजे वराडे ता। मजकूर येथील आपला हरास करून सेतेभाते सितोजी भोसले यानी गुराकडून चारविले व नेले ह्मणोन सताजी मजकुराने विदित केले बितपसील

कि॥ कलम सताजी घाटगा पा। याचे 
पिकले सेत मौजे वराडे बिघे हरजिनसी

३५   ऐन
  २   परडे
४॥   पडपैकी
-------
४१॥

ए॥ साडे एकेताळीस बिघे सितोजी
भोसलियानी मालिस्त करून नेले आहे
ह्मणोन सताजी पा। विदित केले यावर
सितोजीचे भाऊ सटवोजी भोसले यास
विचारिता तकरीर केली यास निर्वाह
देशाधिकारी व पारपत्यगार ता। मा।र याला
आज्ञापत्र सादर करावे ही सताजी
पाटेलाचे पिकले सेत सितोजी भोसले
याणी सदर्हूंपैकी किती मालिस्त करून
नेले आहे हे देसमुख देसकुळकर्णी व
मौजे मजकूरचे वतनदार व गाहीसाक्ष
असतील त्यास सफतपूर्वक आकस व
कोसीस न करिता परनिस्ट मनास आणोन
जितके सेत सितोजीकडे हक्कहिसाबी
होईल त्याची बखेर सिकियानसी
वतनदाराचे साक्षपत्र हुजूर पाठवणे सदर्हू
कलमास गाहीसाक्ष मनास आणाल ते
ऐसी मनास आणने की सदर्हू कलमाचा
निर्वाह होय आण बदलामी न ये ऐसी
परनिस्ट मनास आणोन साक्ष हुजूर लिहिणे
ए॥ कलम एक १

लग .......................................... ०

कि॥ कलम सताजी पाटेल याच्या तिही
तिही आकणीच्या माळ्या दोन सितोजी
भोसलियाने नाइकजीफडतरा मुतालिक
दि॥ मा।इले यास सागोन जाळविल्या
ह्मणोन सताजीने विदित केले यास
सटवोजी भोसले याने विदित केले की
सितोजीने मुतालिकाकडून माळ्या
जाळविल्या नाही यास निर्वाह
तर्फमजकूरचे पारपत्यगार यास आज्ञापत्र
सादर करावे की देसमुख देसकुळकर्णी
व मौजे वराडेचे वतनदार गोहीसाक्ष मनास
आणने की सितोजीने मुतालिकास सागोन
माळ्या जाळविल्या की नाही व एकेके
माळीस काय किंमत बैसली आहे हे बरे
चौकस आकस कोसीस न करिता
परनिस्ट हुजूर लिहिणे सदर्हू कलमास जे
साक्ष मनास आणाल ते ऐसी मनास
आणने की सदर्हू कलमाचा निर्वाह होय
आण बदलामी न ये ऐसी परनिस्ट साक्ष
मनास आणोन हुजूर लिहिणे ए॥ कलम १

कि॥ कलम सताजी पा। याचे पेवे
गल्लियाचे राळे सोळुले नवसेरी खडिया
अडीच होते ते सितोजी भोसले रात्रीचे
येऊन नेले ह्मणोन सताजी मा।र विदित
केले यास सटवोजी भोसले यास
विचारिता सितोजी भोसलियाने पेव गल्ला
राळे खडी अडची नेला नाही ह्मणोन
नाकाबूल गेले यास निर्वाह की ता। मा।रचे
पारपत्यगार यास आज्ञापत्र ल्याहावे की
सदहू्र अडची खडी गल्लियाचे पेवे
सताजीचे सितोजी भोसलियाने नेले आहे
की नाही हे मौजे मजकुरामधे ग्वाहीसाक्ष
असतील यास सफत घालून बरे चौकस
देसमुख देसकुळकर्णी व मौजे मजकूरचे
वतनदार याचे गाहीसाक्षीनसी आकस
व कोसीस न करिता परनिस्ट बखेर
सिकियानसी हुजूर लिहिणे सदर्हू कलमास
ग्वाहीसाक्ष मनास आणाल ते ऐसी मनास
आणने की सदर्हू श्कलमाचा निर्वाह होय
आण बदलामी न ये ऐसी परनिस्ट साक्ष
मनास आणोन हुजूर लिहिणे ए॥ कलम १

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries