मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखक १०३
१६४० पौषशुद्ध ७

श्री

राजमान्ये राजश्री कमाविसदार सावोत्रा प्रा। क-हाड यास नारो शकर सचीव सु॥ तिसा असर मया अलफ मौजे सैदापूर प्रा। मा।र हा गाव समस्त ब्राह्मण वास्तव्य क्षेत्र क-हाड यास इनाम सर्वमान्य आहे त्यास तेथील सावोत्रा ब्राह्मणास पूर्वी पासून दिल्हा आहे त्याप्रमाणे त्याकडे सालदरसाल पावत आहे तरी मौजेमजकूरचा सावोत्रियाचा अकार होईल तो वेदमुर्ती समस्तास पावेल तुह्मी मौजेमजकुरास वसुलाचा तगादा न लावणे पूर्ववत्प्रमाणे ब्राह्मणाकडे चालवणे जाणिजे छ ५ सफर
सुरू सुद

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries