मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १०५
१६४१ पौषशु॥ ५

॥ श्रीविघ्ननाशोजयति ।।

हा गणपति
श्रीमच्चिरजीव शिवदास गोस्वामी या प्रति निरजन गोस्वामी
बिन नरसिह पाठक साख्यायन गोत्र वास्तव्य क-हाड

अशिर्वाद उपरि शके १६४१ वर्षे विकारी सवत्सरे पौष शुक्ल पचमी रविवासरे तद्दिनी श्रीकरहाटक्षेत्री दानपत्र तुह्यास लेहून दिल्हे ऐसे जे राजा शाहू छत्रपती याणी अह्मा यिनाम चावर १ येक मौजे ढेभु येथे दिल्हा आहे त्यांपैकी श्रीमप्रीत्यर्थ बिघे १५ पधरा तुह्मास यिनाम दिल्हा असे तथे धान्य उत्पन्न करून सत्कर्म सत्काळक्षेप करणे यास कोण्ही अन्यथा करील त्यास पचमहापातकाचे पाप घडेल हे दानपत्र लिहिले सत्य भुभवतु

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries