मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

येणेप्रमाणे तिघाचा विस्तार आहे नारायेणभट गोपालभट आपले भाऊ सदासिवभट बिन भानभट हा आपले पदरीचा भाऊ नव्हे देवरात गोत्री मात्र त्यास आपणास समध नाही येणेप्रमाणे लेहून दिल्हे आहे हे श्री मधे निघोन याचप्रमाणे बोलो यासि अन्यथा जाहलो तरी आपणास वृत्तीस समध नाही हे लेहून दिल्हे सही तेरीख २९ माहे शाबान येणे प्रमाणे दुसरेकरानी तकरीर लेहून दिल्ही व वशावली लेहून दिल्ही त्याउपरी विश्वनाथभट बिन बाळभट गिजरे वाईकर यासि तुह्मा उभयेताचा करीना विचारिला त्यास विश्वनाथभट यासि पुसावे एक आणि बोले एक ऐसा चावळू लागला तेव्हा पचाइतानी त्यास ह्मटिले की तुमचे देशपाडे याचे घरीचे उपाध्यपणावरी समजोन राहिला ते वृत्ती व हाली जोसीपणाच्या वृत्ती येक करून त्रिवर्गास देत नाही तुह्मी काही सशये न धरणे भाऊपणा मात्र जैसा असेल तैसा सत्य सागणे ऐसे बोलिले त-ही त्याच्या चित्तास न येता आपल्या मनात सशये धरून नपुत्रा नपुत्री ऐसे बोले त्यावरून पचाइतानी निर्भर्छिला तेव्हा त्याने पचाइतापासी विनती केली की आपली आजी कासीबाई वाईस आहे तीस कुलकट ठाऊक आहे वाईस जाऊन पुसोन येतो ह्मणऊन समागमे मनुष्य घेऊन वाईस गेला मग तेथून येऊन तकरीर लेहून दिल्हा बितपसील

तकरीरकर्दे बो। विश्वनाथभट बिन बाळभट गिजरे वाईकर सु।। आर्बा अशरीन मया अलफ लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे सदासिवभट बिन भानभट गिजरे व नारायेणभट बिन वीरेश्वरभट या उभयेतात पाचा गावीच्या जोतिषपणाचा कजिया लागून स्थलास आले तकरीरा लेहून दिल्हीया त्यामधे उभयेतानी लिहिले की आपण तिघे भाऊ येक वाईकर व येक दुसेरेकर व येक आपण ह्यणऊन लेहून दिल्हे त्यावरून आपणास बोलावून वडिलाचे सत्य घालून विचारिले की उभयतानी तुह्मी भाऊ ह्मणऊन लेहून दिल्हे तरी याचे सत्य स्मरून कोणता भाऊ आपला हा निर्वाह करून देणे त्यास आपले आजीने सागितले की आपला आजेसासरा सागत होता की आपली मूलवृत्ती वीरवाल्हे तेथील जोसीपण ते थिटियाच्या स्वाधीन करून ते स्थल सोडून आले कोणी वाईस राहिले कोणी माहुलीस राहिले कोणी क-हाडी राहिले परतु येकमेकाची वृधिअवरोध, धरीत नाही येणेप्रमाणे आपली आजी कासीबाईने सागितले ते लेहून दिल्हे सही तेरीख १ माहे रमजान

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries