मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

दा। बो। सदासिभट बिन भानभट गिजरे सु।। सलास अशरीन मया अलफ कारणे लेहून दिल्हा कतबा ऐसा जे आपणामधे व नारायेणभट गिजरे यामधे पाचागावीच्या जोसीपणाचा वेव्हार लागून स्थलमजकुरास आलो उभयेतापासून तकरीरा व वशावली घेऊन कागदपत्र वतनाचे देणें ह्मणऊन आज्ञा केली त्यास आपणापासी कागद दोनी दोते ते आपल्या तीथरूपानी मोरेश्वरभट गिजरे यापासी दिल्हे त्या कागदाच्या तालिका व मोरेश्वरभटाचे हातिचा कागद आपणापासी नाही सदरहू कागद दोनी दिल्हे ऐसे साक्षीमुलें खरे करून देऊ न देऊ तरी आपणास वृत्तीस समध नाही हे लेहून दिल्हे सही बिकलम बाबदेवभट गिजरे तेरीख १२ माहे शाबान

त्यावरी पश्चमवादी तुह्मास पचाइतानी पृछा केली की तुह्मापासी कागदपत्र जे वतनाचे बहुतादिवसाचे भोगवटियाचे असतील तरी ते आणून पचाइतापासीं ठेवणे त्यावरून तुह्मी कागद आणून पचाझ्तापासी ठेविले बिता।

६ वृत्तीची पत्रे                   ९ वेव्हारपत्रे
१ पारसी पत्र जुने              ३ देशपाडेयाची पत्रे
४ खडपत्रे                        ३ समापत्रे वाईकर भाऊ
१ जाबिता                        १ राघो जोगदेव याचे पत्र
११ खुर्दखते इनामाची         १ अनदभटास लिहिले पत्र
१ वडगावकराचे पत्र        ------
                                    १७
-------
२४

सदरहू येकेतालिस पत्रे पचाइतमुखे खरी करून देऊ न देऊ तरी गोताचे आन्याई ह्मणऊन बोलोन सदरहू पत्रे पचाइतापुढे ठेविली त्यावरी तुह्मा उभयेता वादियासि पचाइतमुखे निवाडा होईल तेणेप्रमाणे साधल्या आर्थी वर्तवावे तुटल्या अती निवारण करावे येखादेचे जमान देणे ह्मणऊन पचाइतानी आज्ञा केली आज्ञाप्रमाणे तुह्मी उभयेता वादी यानी जमान दिल्हे बिता।

आग्रवादी सदासिवभट यानी जमान दिल्हा

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries