मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १३२

श्री
माहाराज राजाधिराज राजमान्य राजश्री पत अमात्य स्वामीचे सेवेसी विनति सेवेसी सेवक रुद्राजी चदो देसकुलकर्णी पा। क-हाड कृतानेक साष्टाग नमस्कार विनति येथील क्षेम ता। ७ माहे जिलकाद पावेतो सेवकाचे वर्तमान माहाराजाचे कृपार्दिस्टीकरिता येथास्तीत असे माहाराजानी क-हाड क्षेत्रीच्या ब्राह्मणास मौजे सैदापूर त्याचे नाव सिवापूर ठेऊन अग्राहार करून दिल्हे ते क्षेत्रा समीप क्षेत्रीचे विदवान बाधताती ब्राह्मणास गावीची उपजीविका होऊन येईना ह्मणौउन ब्राह्मणानी सागितले त्यावरी स्वामी कृपाळ होउन मौजे अटके दिल्हे त्या पत्रानिमित्य माहाराजापासी वेदमूर्ति मोरेस्वरभट व समस्त ब्राह्मण आले आहेत मजकूरची भूमी चावर  ३६।१८
बिता ।
आवलजमीन चावर                        दुमजमीन चावर                 सीमजमीन चावर
२०१०                                        १३१८                             ३२०

देखील प्राचीन इनामदार आहे तेथील पाटील पलाले आहेत त्यासी आणायाचे येत्न केला आहे तो गाउ दोनी तीन वरसे खराब पडिला आहे स्वामीस ब्राह्मणाचा अभिमान आहे पत्र करून द्यावयास स्वामी समर्थ आहेत बहुत काये लेहू सेवक असो हे विनति

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries