मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २४१ बाळबोध

श्री
वेदशास्त्रसपन्न राजश्री मोरदीक्षित नाना अरणके यास समस्त अष्टेकर व भिलवडीकर सा। विनति उपर अपलि अमचि उभयताचि गाठ बोलिला होता परतु अपले क्षेत्रस्थ विसलापुरास आले त्या मधे अपणा सारिखे मुख्य होते किंवा कैसे होते तेथे प्रकार जिनस्वार झाला ऐसे सुज्ञ कोणते होते आणि कैसे झाले हे सविस्तर लिहावे अह्मी अपले पत्राचे उत्तर यावे यदर्थि क्षेत्रास अपणास विनति लिहिलि आहे तर समस्ताचे उत्तर पाठवा ये विषयी अपले यजमानाचि आज्ञा कि उत्तर आणिवणे तर अपण सत्वर उत्तर पाठवावे गडी रोजगारि आहे नवमीस सायकाळ मर्यादा पोहचे ऐसे करणे सूज्ञा प्रति विशेष काय लिहिणे हे नमस्कार

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries