मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २८३
१७४१ चैत्रशुद्ध १

नकल
श्री जबानी सिवराम डोगरो कुलकर्णी मौजे चितळी का। निंबसोड सु।। अशरीन मया तैन व अलफ लेहून दिल्ही जबानी ऐसी जे वडील हरीपत व दुसरे कृष्णाजीपत तिसरे आह्मी ऐसे त्रिवर्ग भाऊ त्यास कृष्णाजीपत याचे पोटी पुत्रसतान नाही त्यास आह्मी आपला मुलगा जाहला ते समई आह्मी व आमचे बायकूने कृष्णाजीपतास व त्याचे बायकूस वचने करून दिल्हा आहे हाली त्या मुलाचा वृतबध गुलपान व्हावयाचे आहे हे विसी साहेबा कडे आलो त्यास गुलपान वृतबध करावयाची आज्ञा साहेबाची व्हावी ही जबानी लेहून दिल्ही सही तेरीख छ २९ जमादिलाखर ऊर्फ चैत्रशुध १

हस्तअक्षर खुद

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries