मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

विचारास आले आहे तुमचे समत असावे तेव्हा ते आमचे समत आहे ऐसे बोलले नतर समस्तानी उपाध्यास श्नान करून सकल्पास प्रारभ करावा ह्मणोन सागितले तो बाबदेवभट बोलिले किं माहादेव जोसी ह्यणतात हे बरे आहे नतर समस्तानी बाबदेवभटास दोन गोष्टी सागितल्या आणि सकल्पास प्रारभ करविला तो फिरोन बाबदेवभट बोलिले की आमचे दादा घरी नाहीत तेव्हा आणखी दोन गोष्टी सागितल्या आणि सकल्पास प्रारभ करविला फिरोन बाबदेवभट बोलिले की माहादेव जोशी ह्मणताहेत हे बरे आहे इतके बोलोन न पुसता समस्तातून उठोन गेले तेव्हा समस्तानी दोन घटका वाट पाहिली कोठे गेला ह्मणोन शोध केला तो आला नाही तेव्हा समस्त आपलाले घरास गेले नतर दुसरा दिवस बारावा सपिंडीच्या समई बाजीभट याचे मातुश्रीने चिमणाजीपत यास बोलाऊ पाठविले नतर गेले त्यास बाजीभट याचे मातुश्रीने विचारिले की आमचा मूल घेत होता तो काल का घेतला नाही त्यानी उत्तर केले की बाबदेवभट यानी गैरमान्य होऊन न पुसता उठोन गेले याज मुळे येसूबाईचा मनोभग जाला परम श्रमी जाली आता तुमचा पुत्र घेत नाहीत असे उत्तर केले नतर दादभट गिजरे रात्रौ सुभ्या कडे जाऊन सागितले की बाजीभटाची मातुश्री उपोषण करिती त्याज वरून तात्या गिजरे यास सुभ्याचे बोलावणे आले तेव्हा ते गेले सुभाने सागितले मातुश्री उपोषण करिती तेव्हा तात्या बोलिले की उपोषण करावयाचे कारण काय तेव्हा दादभट बोलले की काल त्यिचा मूल घ्यावयाचा केला होता तो न घेतला म्हणोन उपोषण करितात तेव्हा तात्यास सुभा व दादभट याणी सागितले की तुम्ही जाऊन येसूबाईस सागा की आम्ही जात नाही बाईनी घेतला तर बरे नाही तरी तुम्ही च नाश केला म्हणाल तेव्हा जा च म्हणोन बहुत आग्रह करू लागले तेव्हा तात्यानी उत्तर केले की आम्ही येकटे जाणार नाही जाणे च तर दादभट व आम्ही मिळोन जाऊ दादभट आम्ही येत नाही बोलले तेव्हा आम्ही हि जात नाही असे तात्यानी उत्तर केले तेव्हा सुभ्यानी सागितले की तुम्ही उभयता जावे चिमणाजीपत आहेत यास हि घेऊन जावे तेव्हा त्रिवर्ग मिळोन येसूबाई कडे गेले नतर घन शामभट हि तेथे आले त्याच्या सकोच्या मुळे उगेच बोलता राहिले आणि सध्येस जाऊ असे बोलून दादभट व तात्या निघाले तितक्यात बाईचा समाचार घेऊन जावा असे तात्या बोलिले कशास तेव्हा तात्या बोलिले की येथे आल्यास तिजला भेटून जावे ह्मणोन घरात गेले बाईस पुसिले की आपणासी दोन गोष्टी बोलावयाच्या होत्या ह्मणून आलो होतो आता सध्येस जातो बाईनी उत्तर केले की काल समस्त मिळोन काय केले ते आज करावयाचे आहे माझे कपाळी होते ते जाहले इतके श्रवण करून उभयता आगणात आले ते समई दादभट चिमणाजीपतासी बोलले की मी चहू घटकानी येईन मग काय बोलणे ते बोलेन आणि निघोन आले नतर सकेता प्रमाणे दादभट गेले त्यानी येसूबाईस सागितले की तो मूल रोगी आहे ज्याचे लग्न जाले आहे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries