मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ३०४
१७२१ सुमार

श्री
यादी बाबा श्रीधर नरसीपूरकर याचे तीर्थरूपानी आपला भाऊ देशातरास गेला होता तो आणिला त्यास विभाग देऊन परस्परे जननाशौच मृताशौच धरीत आले याज विसी पत्र रगभट याज पाशी आहे हाली रगभट याची स्त्री निवर्तली तिचे आशौच न धरीत ह्मणोन नरसिपुरी खटला पडला सा। बापा श्रीधर याणे क्षेत्रास येऊन विनती केली की आमची वशावळ पाहून शास्त्रार्थ आह्मास सागावा असे बोलिले त्याज वरून वशावलीची चौकशी करिता ज्याणी वशावल दिल्ही त्याणी च वशावळ खोटी ह्मणोन लेहून दिल्हे त्याज वरून पूर्ववत् अशोच धरावे असे सागितले असता अशोच धटाई करोन धरीत नाही सा। सरकारसमत बहिष्कारपत्रे लिहिली त्या प्रमाणे चालत आले हाली परस्परे समजोन अन्नोदकव्यव्हार करो लागले ते समयी आह्मी आक्षेप केला जे रगभट हा तुमचा गोत्रज होय अथवा न होय हे लेहून देणे अनतर प्रायश्चित्त करून अन्नोदक व्यव्हार करणे हे न ऐकता परस्परे धटाई करून व्यव्हार करितात याचा बदोबस्त करावा

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries