मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ३०५
१७२१ सुमार बाळबोध

श्री
वास्तव्य
राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री विठलराव अबा सोनकिरे यासि

समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशळ लिहीत जावे विशेष अपण पत्र पाठविले ते पाले लिहिला अर्थ ध्यानास आणिला त्यास बाबा श्रीधर व त्याचे बधु असामी साहा याचा व रगभट् बिन दादभट् या उभयताचा वृद्धिक्षयाचा खटला पडोन उभयता क्षेत्रास आले त्यास उभयताचे मनास आणिता बाबा श्रीधर याचे हतून वशावळीची पुरवणी जाली नाही सबब पूर्वी पासोन वृद्धिक्षय धरीत आले असता हली रगभट् याची स्त्री मृत्यु पावली तीचे सूतक चौकशी पाहता ठिकाण काही लागत नाहि त्या वरून रगभट् बिन दादभट यानी समस्ता पाशी सागीतले जे वशावळीच्या पत्राचा विचार अवघा तुह्यास ठाउक अहे त्या वरून हे पत्र तुह्मास लिहिले आहे तुह्मी प्राचीन पुरुष माहित अहात हे वशावळीचे पत्र बाबा श्रीधरापाशी अहे ते कोठे जाहले हे सत्यपूर्वक उत्तर लेहून पाठवावे ये विषयी श्रीकृष्णवेणीची व ब्राह्मण्याची तुह्मास शफत असे ब्राह्मण्याचा विषय आहे उभयताची भीड न धरिता सत्य असेल ते च लिहावे त्या प्रमाणे केले जायील

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries