मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

जाब तिमापा यांचे पत्राचे                                                             लेखांक ५०.                                १७१४ मार्गशीर्ष वद्य ९.
सुरापुरास रवाना जासूदासमागमें
मारिनिलेचे छ २३ रााखर

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमापा स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष तुह्मी पत्र पो ते पावले राजश्री गोविंदआपा व सुभराव यांस घेऊन पुण्यास जातो तेथून लौकरच येतो तोपावेतो मंत्रीची मर्जी संस्थानावर राहे ऐसे करणे आपणाकडे फौज येण्याची मनाई व्हावी ह्मणोन तावार लिहिला तो समजला त्यास दरबारचे कामास जो जाबसाल करारांत आला त्याप्रा आमलांत यावे एणेकरून जाबसालाची पत राहून काम होते एक महिन्याचा करार त्यास तीन महिने होत आले अद्याप कांहींएक ठराव नाहीं एथून पुण्यास जाऊन आल्यावर मग ठरणार हे फार लांबण ये विषई इकडून बोलावयास जागा नाहीं याउपरि कोणता तो सिद्धांत ठरून ल्याहावें व तुमचे येणे व्हावे त्याप्रा मंत्रीसी बोलण्यांत येईल इकडून संस्थानचे कामाविषईं पहिले व आतां दुसरा विच्यार नाही येविषीं वारंवार काय ल्याहावे यांचे राजश्री सिवशंकर यांस तरी लवकर इकडे पाठवावयाचे होते ह्मणजे कांहीं दिवस त्याजवर ढकलावयासि येते तेहि न केले यास काय ह्मणावे आतां तरी सिवशंकर यास बरोबर प्यादे देऊन आह्माकडे पाठवावे विलंबावर न टाकावें राा छ २३ रााखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries