मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

पत्र आपाजी बनाजी यास,                                                            लेखांक ५३.                                              १७१४ मार्गशीर्ष वद्य ३०.

राजश्री आपाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहिणे विशेष राघोजी सिंदा इंदापूरकर याचे मळ्यांत भिकाजी अभंग माळी चोरी करावयास गेला रात्रीचा समय चोराचे रखवालीकरितां सिंदे मार याचा भाउ तेथे रखवालीस होता याने दगड फेकला तो यास लागला त्याजवर अभंग मार कांहीं एक दिवस आपले घरी होता नंतर वारला त्याचे भाउबंद याणी कमाविसदारास गैरवाका समजाविलें कीं दगड लागून अभंग मार मेला आहे ह्मणोन कमाविसदारानी निमित्य ठेऊन सिंदा मार याचे घरची चीजवस्त व गुरे ढोरे वगैरे निपंगी नेउन यांची मुलेमाणसे कैदेत ठेविली आहेत ह्मणोन वर्तमान कळले त्यावरून हे पत्र तुह्मास लिहिले असें की सिंदा मार याचा भाउ आपले मालाचे रखवालीकरितां आपले मळ्यांत रात्री जागल करून होता चोर चोरीस आला त्याजवर दगड टाकिला केवळ भिका अभंग आहे असे समजोन दगड फेकला नाही तथापि दगड लागूनच मेला असेहि नाही यानंतर कांहीं एक दिवसानें मेला असे अस्तां सिंदे मार यांचे घरची चीजवस्त गुरें वगैरे नेऊन मुलेमाणसे कमाविसदारानी अभंग याचे भावाबंदाचे गैरवाका समजाविल्यावरून कैदेत ठेविली आहे त्यास येविसीं तुह्मी कमाविसदारास सांगून याची चीजवस्त गुरें वगैरे देवऊन मुले माणसे सोडऊन देवावी र।। छ २८ राखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries