मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

राजश्री बालाजी नाईक औरंगाबादकर                                               लेखांक ६५.                                                         १७१४ पौष शुद्ध ११.
सुभेदार यांचे नावें पत्रें
राजश्री कोनेर बाबुरावे याजविसी
रा छ ९ जावल सन १२०२.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजी नाईक स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित आसिलें पाहिजे विशेष पा कनड येथील देशमुखी व देशपांडिये-पणाचे गुमास्तागिरीचे काम राजश्री अनंदराव जाधवराव यांजकडोन राजश्री कोनेर बाबूराव यांचे पुत्राचे नावें तेथील कामावर यांजकडोन शाहाजी पाटील आहे त्यास अजपावेतो नवाब अजीमुदौला सुभेदार होते त्याजकडोन कोण्हेविसी उपसर्ग जाला नाहीं सांप्रत पहिले गुमास्ते तेथें आहेत त्यांचे सांगितल्यावरून काही कागदपत्राविसी स्वार सजावल पाठऊन रोज खुराक वगैरे उपद्रव केला आहे त्यास हे गुमास्ते नवे यांस कागदपत्राची माहीतगारी नाहीं आणि माहालांत कची कमावीस तुमची जमीदाराचे स्वाधीन काय आहे तथापि मारनिले आमचे पदरचे यांचे हरएकविसी साहित्य होत असावे व यांचा आगत्यवाद धरून चालवावे असे आहे याजकरितां हे पत्र लिहिले असे की पाटील मजकूर यांजपासोन रोजाबाबत रुपये घेतले असतील ते माघारे देऊन स्वारीस बरखास्त द्यावी पुढे पहिले गुमास्ते यांचे सांगितल्यावरून उपद्रव कोण्हेविसीं न करावा पाटील मार याचे हरएकविसीं साहित्य करून हाकरुसूम वाजवी प्रो आमीलास व मुकदमास ताकीद करून देवावा आह्मास आगत्य त्यापक्षीं तुह्मीहि आगत्यवाद धरून साहित्य करीत जावें घराउ काम जाणून लिहिलें असे फिरोन बोभाट न ये ते करावें छ ९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries