मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

पत्र भीमराव श्रीपत यांस जासूद                                                   लेखांक ६१.                                                           १७१४ पौष शुद्ध ५.
जोडी समागमें पत्र पो छ ३ जावल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें विशेष ऐवजाकरितां राजश्री बालाजी व्यंकटेश यांस इकडून पो नवाब रणमस्तखान यांजकडून ऐवज तुह्मी आपल्यापासी घेतला त्यासही फार दिवस जाले अद्याप इकडे ऐवज पाठविला नाही अपूर्व आहे एथें ऐवजाची निकड जाणून लिो असे तर पत्र पावताक्षणी तुह्मापासील झाडून ऐवज व अलफखान बाहादूर यांजकडून येणे तो व्याजसुधा एकंदर हिसेबा प्रो राजश्री बालाजी व्यंकटेश यां समागमे सत्वर रवाना करून मारनिलेस पाठवावे ऐवजाचे हिसेब मारनिले समजावितील त्या प्रो झाड्यानिशी पाठवावा याउपरि दिवसगत लागो नये ऐवज व्याज व हुंडावणसुधां एकंदर ऐवज लौकर भारनिले समागमे हुंड्या देऊन रवाना करणे ह्मणजे ऐवज मार्गाने येण्याची व इंडणावळीची कटकट बालाजी व्यंकटेश यांजकडे न पडावी रा छ ३ जावल बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries