मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

व्यंकटराम पिला चिना-पटणकर                                                    लेखांक ९१.                                                         १७१४ पौष वद्य ४.
याचे पत्राची उत्तरे दोन र।।
छ १७ जावल.

राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास-
5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण असीर्वाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष तुह्मी छ १७ माहे राखरचें पत्र पा ते पाऊन सविस्तर मा अवगत जाला श्रीमंतास अर्जी व अखबार बेगोंद पा आहे हे पाहून पुढे रवाना करावी आजपावेतो सात पत्रें पाठविली असे परंतु जवाब न आला याजमुळें पुढे लिहिण्यास अनमान व पुढें नवल विशेष लिहिण्यास आंगेज पुरत नाही इत्यादिक मार लिहिला तो सर्व समजला ऐसियास पत्रें पावलीं मार समजला एथून जाबहि रवाना जाले आहेत पावले असतील याउपरि पत्रें रवाना करण्याविसी अलस न करावा र।। छ १७ जावल बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद भोंसले यांजकडील रामचंद्रपंत यांचे पत्र तुह्मी पाठविलें त्याचा जाब त्याणी दिल्हा तो पाठविला असे हे आसीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries