मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

                                                                                               लेखांक ९२.                                                         १७१४ पौष वद्य ४.

राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास-

5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मी छ २७ माहे रबिसानीचें पत्र पाठविले तें छ १३ जावली पावलें पेशजी तुमचे लिहिण्यांत च्यार दफे पत्रें रवाना केली पैकी तीन दफे पोंहचून एक रवानगी न जाल्याचें लिहिलें ती पत्रें गैरविल्हे पडून तुह्मापासी फिरोन आलीं याचा ता। लिहिला तो समजला राजश्री नाना यांचे नावें तुह्माकडून पत्राचा लाखोटा आला तो व आमचे पत्रांत अखबार पाठविली ते पुणियास रवाना केली पहिलीं पत्रें व हलीची याचे उत्तराविषई लिहिलें आहे उत्तरें येतांच तुह्माकडे रवाना होतील वरचेवर तिकडील कचे पकें वर्तमान लेहून पत्रें पैहाम रवाना करीत जावी काळा वाळा वास न जातां बंदोबस्तीने पाठवितो ह्मणोन लिा उत्तम आहे पालखी वगैरे सरंजाम तयार जाला आठ दिवसांत रवाना करितों ह्मणोन लिा त्या प्रा सरंजाम रवाना केलाच असेल नवाब उमदतुलउमराबाहादूर यांचे जोबसालाविषी लिहिलें त्यास हा मार पुर्ता समजण्यांत आल्यानंतर इकडून अनमान व्हावयाचा नाही येविषी विस्तारे लिहिणे नलगे वरचेवर पत्र पाठवून वर्तमान लिहित जावें र।। छ १७ जावल बहुत काय लिहिणे हे आसिर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries