मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[२६५]                                                                       श्री.                                                              ८ जानेवारी १७३१.                             

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरि तागाईत पौष शुद्ध द्वादसी भृगुवासर पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. स्वामीनीं आशीर्वादपत्र राजश्री दत्ताजी कनोजे यांजबरोबरी पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवणें बहुत समाधान जाहालें. सारांश मशारनिल्ले याणीं आमचा हुकूम पाळून वर्तणूक केली, यास्तव यांचा घात जाहला. आपणाजवळ आले. याचें समाधान करून तुमचे भेटीस पाठविले असेत. यास सर्व जाणतात. रोजगारही मिळतील. परंतु तुमचे सेवक दुसरी यांजकडेस जावे, उचित नव्हे. ह्मणोन कितेक विषादेंकरून आज्ञा केली ते संपूर्ण कळली. ऐशास मशारनिल्ले त्याणीं आमचा हुकूम पाळला ह्मणोन श्रम भोगावा ऐसे नव्हते. परंतु भोगानरूप जो प्रसंग जाहाला त्यास इलाज नाही. जें होणें जाणें तें ईश्वरीच्छेनुरूप होतें. प्रस्तुत यांस येथें ठेऊन घ्यावे तरी तीर्थरूप राजश्री सखोजी बावा याणीं निरोप देऊन स्वामीकडेस पाठविले असतां आह्मी ठेवावें हे गोष्ट तूर्त अनुचित व यांसही प्रशस्त नाही. या निमित्य मशारनिल्लेस निरोप देऊन स्वामीचे सेवेसी पाठविले असेत. पुढें तीर्थरूपांची आमची भेट जाहल्यानंतर जो विचार करणें तो करून. स्वामींनीं तो सर्व प्रकारें यांचा अभिमान धरिलाच आहे. जे गोष्टीचें आह्मांस अगत्य, तेंच स्वामीनीं मनावरी धरिले असतां आह्मी तपसिलें स्वामीस लिहून पाठवावी ऐसें नाही. वरकड कृष्णंभट देसाई याचा अभिमान धरावा ह्मणोन आज्ञापिलें. तरी जे स्वामींनीं अगत्य धरून तीर्थरूपांजवळून व आह्मांकरवी उदक घालविलें आहे त्यास अन्यथा आहे ऐसें तो नाहीं. त्यांचे त्यांहीच अन्यथा केलें तरीच नकळे. दुसरी गोष्ट ढोरें डोरले महाळुंगे यास ठेविली होतीं. परंतु तो जागा ढोरांस मानत नाही. याबद्दल विलवडें वाटुळ या गांवी ठेविणार. त्यास गांवकरांस ताकीद करून कांही उपसर्ग न लागो, ऐसे ताकीदपत्र गांवकरांस घ्यावे म्हणोन स्वामीनीं लिहिलें. त्यांवरून गांवकरांस ताकीदपत्र दिले असे. ढोरें हरदू गांवी जेथें अनुकूल पडेल तेथें ठेवावी. याविशी आपले माणसांस आज्ञा करावी. विदित जाहलें पाहिजे, बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान करावी. हे विनंति.

                               
                                                                                                                                       265

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries