मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३४५]                                                                         श्री.                                                                   २१ जानेवारी १७४२.

श्रीमत् तीर्थस्वरूप राजश्री परमहंसबावा वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक विज्ञापना येथील कुशल तागायत पौष बहुल एकादशी सौम्यवासरपावेतों वडिलाचे कृपेंकरून सुखरूप असो. विशेष. तीर्थरूप राजश्री सरखेल साहेब यांचे शरीरी अनारोग्यता तीनमासपर्यंत होऊन पौष बहुल तृतीया भौमवारी संध्याकालचें तास दिवसास कैलासवास केला. ऐसा प्रसंग ईश्वरें आह्मांवर केला. बरें ! होणारास यत्न काय आहे ? वडिलाचे पुण्येंकरून व स्वामीचे आशीर्वादेंकरून कल्याणच होईल. परंतु वडिलांनी कृपेकरून अपत्यावर पाहोन परामर्ष करावा. वरकड हा मामला आहे हा वडिलांचा आहे. तरी अभिमान न धरून मनसबा चालोन जग नामोश होई तो अर्थ करणार आपण वडील आहात. सदैव पत्र पाठवून परामर्ष करीत असिलें पाहिजे. बहुत ल्याहावें तरी आपण वडील आहांत. सेवेसी विदित जाहालें पाहिजे. हे विज्ञापना. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries