मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३४८]                                                                         श्री.                                                                १५ एप्रिल १७४३.

श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे चरणावर मस्तक ठेवून दंडवत विनंति येथील क्षेम वैशाख शुध्द द्वितीया भृगुवासरपावेतों स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. सांप्रत स्वामीचे आशीर्वादपत्र येऊन अपत्याचा सांभाळ न जाहाला ऐसे नसावें. निरंतर आशीर्वादपत्रीं सेवकाचा परामर्ष करावया स्वामी समर्थ आहेत. वडिलांहीं स्वामीची सेवा करून कृपा संपादून घेतली त्याहीपेक्षां अधिकोत्तर सेवा करून स्वामीची दया संपादावी हाच कायावाचामनेंकरून सेवकाचा हेत असे. स्वामीचे चरणाविरहित अन्यत्र जाणत नाहीं. सर्व मामला सबा स्वामीच्या आशीर्वादाचा आहे तेथें दुसरा वीर नाहीं. तदनुरूप स्वामी पूर्णपणे अशीर्वाद सेवकाचे मस्तकी ठेवून चालणार स्वामी वडील आहेत. स्वामीचे सेवेसी किंचित् जिन्नस वस्त्रें पाठविलीं आहेत. त्याची पुरवणी निराळीं सेवेसी लिहिली आहे. त्याजवरून विदित होईल. कृपा वर्धमान करावी. हे विज्ञापना. + हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries