मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ २६१ ]

श्रीमार्तंड शके १६७४ आश्विन शुद्ध २.

राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसि :-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्रो
मल्हारजी होळकर दंडवत विनंती. सु॥ सलास खमसैन मया अलफ. तुह्मांकडे सरकारचा ऐवज. ते ऐवजीं बा। देणें, राणोजी थोरात, समजाविस, रुपये ५,५०० साडेपांच हजार देविले असेत. सदरहू ऐवज पावता करून कबज घेणें. छ. १ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद.

श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी
होळकर.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries