मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ २६२ ]

श्रीमार्तंड शके १६७४ आश्विन शुद्ध ४.

श्रीह्माळसा
कांतचरणीं तत्पर खं-
डोजीसुत मल्हारजी
होळकर.

राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसिः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥

मलारजी होळकर दंडवत विनंती सुहुरसन सलास खमसैन मयाअलफ. तुह्माकडे सरकारचा ऐवज. ते ऐवजी बा। देणें राहोजी थोरात यासी समजाविसमुळे रुपये ५०० पाचसें देविले आहेत. सदरहू पावते करून कबज घेणें. छ ३ जिल्हेज. हे विनंती.

मोर्तब
सुद

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries