मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना, अलफखान करनुळकर यांजकडुन रणदुलाखान नवाबांकडें आले. त्यांचे बोलणें मध्यास्तासीं होऊन अलफखान यांजकडे कुल तालुका बाहाल जाला. “ टिपुकडील पेषकसीचे यैवजाची निकड करनुलकरास लागली. याचा बंदोबस्त व्हावा " म्हणोन रणदुलाखानाचें बोलणें, मध्यस्ताचे म्ह ( ण ) णें कीं “ लाड बाहादुर यांसलेहून बंदोबस्त होईल तेथवर करितो, परंतु रणमस्तखान यांचा मोहरी दस्त यैवज टिपुपासीं असल्यास पेषकसीचा यैवज सालाबाद देणे प्राप्त करार. च असा आहे, त्यापक्षीं दस्त यैवजः निघाल्यास बोलण्यास जागा नाहीं. परंतु दस्त यैवज मोहरी त्याजपासीं नाहीं. जर दस्त यैवज असता तर आजपर्यंत कैद करून कशास ठेवते ? तथापि निघाल्यास दोन लाख रु. पेषकसीचा दस्त यैवज असला तरी लाख रु. तीन सरकारचे व लाख टिपुचे याचा निर्णय पुढें पाहता येईल. त्यास तुम्हीं बंदगान अली यांचे नांवें अर्जी ल्याहावीं कीं, टिपुकडील पेषकसीचा तगादा होतो. त्यास रणमस्तखान यांचे मोहरी दस्त यैवज त्यापासीं निघाल्यास मंजूर." याप्रा रणदुलाखान यांसी मध्यस्तांनी बोलून रणदुलाखान यांची अर्जी सदरहुप्रा नबाबास देण्याचा मसविदा मध्यस्तांनीं रणदुलाखान यांस आमचे समक्ष करून दिल्हा, रा छ ६ माहे सफर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries