मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.

विनंति विज्ञापना. चेनापटणाहून व्यंकटराम दीला याजकडील अखबार आली, ती सांप्रत रवाना केली आहे. राजश्री गोविंदराव सेवेसीं प्रविष्ट करतील. अवलोकनें सविस्तर मार घ्यानांत येईल. र॥ छ. २८ मोहरम हे। विज्ञापना.

श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.

अखबार ई॥ छ ९ मोहरम त॥ छ, २५ माहे मार पर्येंत र॥ छ, २८
मोहरम.
विनंति विज्ञापना, राजेश्री रघोजी भोंसले सेनासाहेबंसुभा यांचें पत्र आह्मांस आलें कीं, पुण्यास राजश्री श्रीधरपंत व कुशाबा चिटणीस यांची रवानगी राजश्री बाबूराव यांजसहित केली ह्मणोन; व सदरहु अन्वयें नवाबासही सेनासाहेबसुभा यांचे खरीता पत्र आलें तें त्यांजकडील माधवराव रामचंद्र यांनीं गुजराणिलें. र॥ छ, २८ मोहरम हे विज्ञापना.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति विज्ञापना. छ. २८ मोहरमी प्रथम प्रहरीं मिस्तर इष्टावरट फिरंगी । मिस्तर ज्यान कनवी कडील आला होता. नवाबही बाहेर आले. दरबार जाला, फिरंगी मार यानें अर्ज केला कीं छ. १४ मोहरमी फुलकचेरीत इंग्रजाकडील ठाणें कायेम जालें................त्याजवरून खुषीच्या तोफा सोडावयास हुकुम केला. एकवीस बार जाले. कसी घेतली याचा तपसील मागाहून समजून घेऊन लिहून पाठवीन, र॥ छ, २९ मोहरम हे विज्ञापना.
छ ६ सफरी टप्यावर पुण्यास.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries