मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु १३. बुधवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. नवाबांनीं आपले समक्ष दौलास व अजमखान यांस सरकार कामावर येक विचारें राहून कामाची वहिवाट करावयाचें सांगोन सफाई उभयताची करून दिल्ही. अजमखान यांस दौलाकडे जाण्याचें सांगितल्यावरून खान मार दौलाकडे गेले होते तेही अजमखान यांचे घरास जाणार. याप्रा तूर्त असा क्रम चालिला आहे. येकंदर पागेचे माहाला पौ दिलदारखान यांस जागीर साडेतीन लक्षांची नवाबांनीं लोहारें व आलुर हे दोन महाल नेमून दिल्हे. त्याप्रा या पुण्यांतून दोन माहाल त्याचे निसबतीस जाले. आलंद व गुंजोटी हें दोन माहाल व्यंकटराव यांजकडे अजमखान यांचे तर्फेनें देविले. बाकीचे सर्व तालुकियास अमील अजमखान यांनीं ठराऊन पाठवावें यैसा बेत ठरला ........ वगैरै अजमखान यांस व्यंकटराव ........ वा त्यांचे इस्तसवाबानें काम करावें यैसें ठरलें. या छ. ११ माहे सफर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries