मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. १३ बुधवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. राजश्री बाबाराव गोविंद यांची रवानगी पुण्यास होण्याविषयीं दौलांनीं नवाबास अर्ज केल्यावरून “ बाबाराव यांस रुखसतीस घेऊन येणें " ह्मणोन नबाबांनी दौलाकडे सांगोन पाठविलें. दौला भार निलेस घेऊन नवाबांकडे गेले. छ. १० सफरी बाबाराव गोविंद यांस नवाबांनी रुखसत दिल्ही. याउपरी दौलाचा निरोप घेऊन रवाना होणार नवाबांनीं ........ बाबाराव यांचे तुमचें बोलणें दो ........ मग बाबाराव यांनीं जावें. त्यास दोलासमवेत बाबाराव यांचे बोलणें या उपरी जें होईल त्याची विनंती मागाहून लिहितों, रा छ, ११ माहे सफर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries