मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. घासीमियां यांजकडे पहिली पागेपैकीं जागीर व लोकनेमा प्रा आहेत. या सिवाय त्यांचे पुत्राचे नांवें नवा पांचसे लोकांचा करार जाला. पांचसे लोक नवे ठेवण्याचे मियांस सांगितलें, त्यावरून ते लोक ठेवाववयास लागले. सदरहु पांचसे लोकांचा यैवज इतलासी अगर जागीर हें कांहीं अद्याप ठरलें नाहीं. ठरल्यानंतर विनंती लिहिण्यांत येईल. रा छ. २ माहे रावल हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries