मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. छ. २७ सफरीं सैर करण्याकरितां नवाबाची स्वारी सिध जाली, पागेवाल्याकडील लोक वगैरे बाहेर दाटी फार जाली. सैद उमरखां यांचे चौत्र्यावर भावसिंग चौधरी बसला असतां घांसी मियांकडील घौड्याची लाथ चौधरी यास लागोन दांत पडले. घोड्याची लात बेजरब बसली. दोन घटिका मुर्छित चौधरी पडला. माणसांनीं उठवून त्याचे घरास नेलें, “ होट तुटला, त्यास टांके देऊन नीट करणें” याप्रा नवाबांनी ताकीद केली. फिरंगी हाकीमास चौध-याकडे पाठवून टांके व मलम देत असतात. चांगले होण्यास पांच च्यार महिने पाहिजेत. अशी अवस्था चौधरी याची जाली. रा छ. २ माहे रावल है विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries