मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
कार्तिक वा ९ बुधवार शके १७१५. ता० २७ दिसेबंर १७९३.

विनंती विज्ञापना. अजिमुदौला यांजकडील नरसिंगराव व खानसामा वगैरे लोक सांपडले ते यै (औ,) रंगाबादेहुन चिमणा राजे यांनीं येथें पाठविले. त्यांस कैद करून बेदरचे किल्यांत दाखल केलें. या छ २२ माहे साखर हे विज्ञापना.

श्री.
कार्तिक वा ९ बुधवार शके १७१५. ता० २७ दिसेबंर १७९३.

विनंती विज्ञापना. नवाबास राव सिदें याजकडून घोडे आरबी दोन व काठेवाडी दोन (व) येकुण च्यार; व गुलकंद व गुलाब वगैरे जिंनसे आला. या समंधे बाबाराव यांची अर्जीसहित हरराव यांनीं छ २० राखिरीं दौलाचे विचारें गुजराणिले. राछ २२ राखिर हे विज्ञापना. सिंयांनीं पाठविली किंवा कल्याणराव यांनी विकत घेऊन पाठविली याचा संशय आहे. शोध करून लिहितो. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries