मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
कार्तिक वा ९ बुधवार शके १७१५ ता० २७ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग याचा पता लावित भारामल ह्मैशा पावेतों गेले उमरखेडकर कमा विसदाराचे दोन कारकुन भारामला सभागमें आहेत. त्यांस ही निकड कीं शकंराव याचा पता लाऊन देण्याचा जिमा तुमचा. त्या प्रा पता लाऊन देणे. त्यावरून शोध लावितां शंकरराव याची बायको व जवांहिराचे डबे दोन व सनगे पोषागियाचे पेटारे सांपडले. डबे व पेटारे भारामल यानीं दौलांकडे पाठविलें. सदरहु अन्वयें मारही मारामल यांनीं दौलास लिहिला. शंकरराव अद्याप सांपडला नाहीं. पुढे होईल त्या प्रा विनंती लिहीन. शंकर नाईक नागपुरास गेला याजकरितां भोंसल्यांस पत्रें जावीं, आणि त्यांजकडील कारभारी पुणियांत आहेत त्यांस ताकीद व्हावी ये विषई पेशजी नवाबाचे आज्ञे प्रमाणें दौलानीं सांगितलें त्याची विनंती पूर्वी लिहिली, त्याविसीं आज्ञा जालीच असेल. राछ २२ माहे राखर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries