मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-नवाबांनीं श्रीमंतास पत्र पेशजी पो।. त्याचा जबाब सरकारांतून रघोत्तमराव यांचे विद्यमानें रवाना जाला. याचा इतला राजश्री गोविंदराव यांणीं इकडे लिहिला आणि जवाबाचा मसावदाही पाठविला. त्या वरून मजकूर समजला. त्यास मसविदा मध्यस्तांस दाखविला असतां त्यांस कांहीं त्यांत गोड वाटावयाचें नाहीं. सबब मसविदा जवळ ठेऊन पत्र त्यांजकडें परभारा आल्याचें वर्तमान समजल्यावरून मध्यस्तांकडें कोन्हरेपंत यांस पाठवून त्यांस विच्यारिलें कीं “जवाब आपल्यापासीं आला कीं नाहीं. " याजवर मध्यस्ताचे बोलण्यांत आलें त्याचा तपसील गोविंदराव यांस लिहिला आहे. मारनिले विनंति करतील. त्यावरून सविस्तर ध्यानांत येईल. र॥ छ. ६ जिलकाद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries