मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-होळकर सिंदे प्रकर्णी लढाईचें बोलणें चालत असतां मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिलें कीं “हजरतीकडून राव सिंदे यांसी दोस्तीचा सिलसिला ठेवण्याची स॥ कीं राव पंतप्रधान यांचे तर्फेनें हिंदुस्तानचे बंदोबस्ताचे कामांत राव सिंदे शाहज्यानाबाद आदिकरून बादषाही कामावर सरगरम. यास्तव त्यांसीं दोस्ती ठेवणें लाजम व सलाह दौलत. बादषाही बंदोबस्तांत राव पंतप्रधान यांजकडून जो मुखत्यार तेथें राहील त्यासीं दोस्ती व ऐगानगतीचा सिलसिला ज्यारी करणें प्राप्त आहे.” याप्र।। नवाबाचें समक्ष मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिलें. ध्यानांत यावें, यास्तव विनंति. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries