मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार )

विनंति उपरि. वाबले प्रकर्णी वगैरे म॥र पेशजी मध्यस्तासी बोलण्यांत
भाल्याचें यापूर्वी लि।। आहे. छ. २३ रोजीं मध्यस्तासमीप रावरंभा असता बाबले संबंधीं पाटिलबाबा व कल्याणराव यांस आपलीं व बाबाराव यांचीं पत्रें देवावीं या प्र।। बोलण्यांत आलें. त्यांनीं रावरंभा यांस विचारलें, हे बोलले “कीं वाबले पानगलीं आले तेव्हां बाजीद होऊन ‘ तीस हजार द्यावे ह्मणजे फारकत देतों’ ऐसें बोलत असतां ते समंई फडक्या न केला हें बजाजी पंतास पुसावें. ” बजाजीपंत बोलले “पंचवीस हजार, आह्मी बाबल्यास घ्या ह्मणत होतों. वाबल्याचे ह्मणणें ‘तीस हजार द्यावे’ या प्र॥ होतें. '' रावरंभा बोलले:-“मागें असा सोयेवार फडचा होत असतां तो राहून हलीं पंचवीस हजार तूर्त द्यावे, फडच्या पुढेंच; तेव्हां ऐवज तरी बाबल्यास किती ह्मणून द्यावा?” आह्मीं बोललों-“ याचा जाबसाल पाटीलबावापासी पडला. बाबाराव यांचे विद्यमानेंच ठराव झाला. त्यांस विचारावें”. त्यावरून, बाबाराव तर दरबारीं नव्हते, हरराव यांस मध्यस्तांनीं विचारलें. “जो फडच्या पंचवीस हजारावर पानगलीं होत होता तो आतां वाबल्या पंचवीस उगेच घेऊन, पुढें पन्नास हजार यावे, पाउण लाख द्यावे हें बोलतो ह्याचें काय” हरराव बोलले. “वाबले कजियेदलाल कोणाचे ऐकावयाजोगे नाहींत." मध्यस्तास ह्मटलें “आपण येविषयीं | पाटीलूबावा, कल्याणराव यांस पत्रें द्यावी.” त्यांचे बोलणे “ कल्याणराव यांस पत्र देतों, पाटीसबावास देत नाहीं. कारण कीं बीडचें कजीये हजारों पडतील; त्याच्या भीड़ा घालतील; यास्तव त्यांस पत्रे लिहित नाहीं. बाबाराव यांनीं राव सिंदे कल्याणराव व आबा चिटणीस याजला पत्रें लेहून द्यावीं ? या प्र॥ हरराव यांस ताकीद केली. ‘आपलेंही पत्र कल्याणराव यांस देतों ' याप्र।। बोललें. पत्रें आल्यानंतर रवाना होतील वाबले यांचीं पत्रें रावरंभा यांस आलीं. त्यांत ' कारभारी याकडोन फडच्या होत नाहीं ' हा गिला करून लिहिलें: पत्रे रावरंभा यांनी आह्मांस दाखविलीं. सारांश रावरंभाचे दौलतीस चांगलें पडावें ह्मणोन केलें. तत्रापि असें पडून त्यांचे गांवीं कांहीं नाहीं; याप्रा।। होतें. मुगुटराव वावले यांनीं आठरा हजारांचे रोख्याकरितां वसिलेदाराकडून मसाद्याबाबत ऐवज येणें येविषयीं वाबल्यांनी आह्मांस पत्रें व याद पाठविली. सरकारचें पत्र मध्यस्तास आलें व हरि नारायेण यांस वाबळ्यांनीं लिहिलें आहे तीं पत्रें मध्यस्तास पावतीं झाल्यावर ठरेल त्या प्रा। लिहिण्यांत येईल रा। छ० २ जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries