मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार )

विनंति उपरि. “वराडचे खुर्द्यामुळें दोन्ही सरकारचें नुकसान, याचा नक्षा ठराऊन सांगतों. याप्रा पेशजी मध्यस्तानीं सांगितल्या अन्वयें इकडून लिहिलें होतें. त्यास खुर्द्याचें लौकर ल्याहावें. मार्गाचे रितीनें उमरखेडचा बंदोबस्त मदारुल्महाम करतील. हें तुह्मी लिहिल्या प्रा। मध्यस्तास सांगितलें यांनीं तिकडील प्रांतीं, खुर्दा, कोणते माहलीं कसी चाल ? याचे पैसे, अधेले, पाठऊन देण्याकरितां सैदमुजवरखान यांस लिहित्यावरून त्यांनीं वसमत, माहूर, वासीम, परबणि, हाटें ? उमरखेड-वराडी-इत्यादिक महालचे पैसे मासल्याकरितां पाठविले. ते पुण्याकडे रवाना कर्ण्याकरितां मध्यस्तांनी आम्हाकडें पाठविले व तमाम प्रांतीं अमुक माशांचा पैसा चालावा हा नक्षाही ठरविला. याच्या यादीही यानीं तयार करविल्या प्रा देणार. ते घेऊन मागाहून रवाना करण्यांत येईल, रा। छ० २ माहे जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries