मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति. उपरि तनखाबाबत यैवज यैकंदर पौ वसुल वजा होऊन बाकी तीन लक्ष बेवीस हजार सातसें नवद रुपये सवा पंधरा आणे निघाले. यापैकीं पटणचे स्वारींत मध्यस्ताचे विद्यमानें जगधन साहुकार याचें कर्ज सवातीन लक्ष राजश्री हरिपंत तात्या यांनीं सरकारांत घेतलें. त्या यैवजीं हलीं येक लाख रुपये वसूल त्या रोख्यामागें घातला. यैवज औरंगाबादीं द्यावयाचा सबब तेथील हुंडावन दर सेंकडा दोन प्रों दोन हजार रुपये यानीं घेतला. हुंडावनीचें बोलणें बहुत होतें. परंतु सेवटीं दोन रुपये प्रों ठरलें. सारांश येक लाख रुपये रदकर्जी वसूल पावला. पेशजी जगधनाकडे भरणा सर बुदंलजंग घासीमिया वगैरे यैवजबाबत एक लाख बतीस हजार नऊसें पंचवीस जाला, हलीं हे लाख पावले. यासिवाय येथून पत्र राजश्री हरिपत तात्या यांस मध्यस्तांनीं पेशजी चोबीना खरीदीकरितां येक लाख ब्याणव हजार रुपयाचे मागितल्यावरून दिलें. त्यापैकीं तेथें वसूल काय दिल्हा हें लेहून पाठवावें, ह्मणजे येकंदर वसूल रुजू करून रोख्या चा हिसेब व्याजसुद्धां करून पाठविण्यांत येईल. तनख्याचे ऐवजीं लाख रुपये हुंडणावळसुद्धां रदकर्जी द्यावे म्हणोन तुमचे लिहिण्यांत आलें, त्यावरून दिल्हें. आणि बाकीची जगधन याजवर चिठी घेऊन, पा आहे. चिठबिमोजीब साहुकारी दुकानावर यैवज घ्यावयाचा , अहसनुदौली यांस सोळा हजाराविसीं पत्र मध्यस्ताचें पों आहे हें रवाना करून तगादा करून यैवज घ्यावयास ढील पडूं नये. रा छ २३ जिल्हेज हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries