मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.s
पु। राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति. उपरि तनखांचे यैवजाची बाकी तीन लक्ष बावीस हजार सातसें नवद रुपये सवा पंधरा आणे निघाली. यापैकीं रदकर्जाबाबत यैवज वसूल रोख्या यैवजीं येक लाख व हुंडावन औरंगाबादची दोन हजार वजा जातां बाकी दोन लक्ष वीस हजार सातसें नवद रुपये सवा पंधरा आणे याची चिठी औरंगाबादेवर जगधन साहू याचे दुकानीं घेऊन पा आहे. चिठीचा वायदा ई।। छ २० जिल्हेज पासोन छ २० सफर येकूण दोन महिन्याचा आहे. सदरहू मुदतीस रोख यैवज घ्यावा याप्रों ठरून चिठी निखालस पा। आहे. सदरहूप्रों तनखाबाबत यैवजाचा फडच्या जाला. मुदतीप्रा जगधनाचे दुकानींहून औरंगाबादीं सदरहू यैवज घेऊन रसीद द्यावी लागेल. त्या रसिदीचा मसविदा पा आहे. त्यास सरकारांतून यैवज घेण्यास जातील त्यानें आपले नांवची रसीद सदरहू मसविद्याप्रा देऊन यैवज रोख घ्यावा.
रा छ २३ जिल्हेज हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries