मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. टिपूकडील पत्र मध्यस्तास आलें, त्याचा जबाब त्यास रवाना करण्याचा यांनीं ठरविला. त्यांतील म॥र कीं “ तुम्हीं शूतर स्वारा समाममें पत्र पाठविलें, त्यांत इकडील तिसरे किस्तीचा यैवज कडप्यास सबरखामासमागमें रवाना केला तो घेऊन रसीद द्यावी; व दुसरे हफ्याची रसीद आपल्याकडून आली नाहीं ते पाठवावी म्हणून लि॥ त्यास दुसरे हप्त्याचा यैवज कडपे येथें अद्याप तुम्हांकडून दाखल जाला नसतां रसीद पाठवावी पैसें लिहिलें हें काय ताजूब आहे ? येथून सैद गुलाम अली यां समागमें, रसीद दुसरे हप्त्याची देऊन त्यास कडपें येथें रवाना केलें. यैवज लौकर दाखल व्हावा म्हणजे पारखून घेऊन सैद म॥र रसीद देतील तिसरे किस्तीचा यैवज कडप्यास पोंहचतां व्हावा. तेथें यैवज दाखल झाल्याचें पत्र सैद गुलाम यांची अर्जी येथें पोंचतांच तिसरे हपत्याची रसीद येथून रवाना होईल. या प्रा टिपूचे पत्राचा जबाब यानीं ठरविला. सैद गुलाम यासही सदरहु अन्वयें यांनीं पत्रें लिहून रवाना केली कीं, टिपूकडील दुसरे हप्त्याचा यैवज कडपें येथें पारखून घेऊन तुह्मांपासीं रसीद दिल्ही ते त्यांजकडे द्यावी. तिसरे हप्त्याचा यैवज कडप्यास दाखल होतांच तुमची अर्जी यावी. ह्मणजे तेही रसीद येथुन रवाना करण्यात येईल. या छ, २८ मोहरम हे विनंति, विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries