संस्कृत भाषेचा उलगडा

१ साधे धातू
अद् = अद्मि ( अद् + मि)
तुद् = तुदामि ( तुद् + आमि)
हन् = हन्मि ( हन् + मि )
दिश् = दिशामि (दिश् + आमि)
वह = वहामि ( वह् + आमि)
यज् = यजामि (यज् + आमि)
अद्, तुद्, हन् इत्यादी जे वर धातू दिले यांना अविकृत किंवा साधे धातू हे नाव यथार्थ आहे. या साध्या धातूना इतर धातूंचे जोड देऊन जोड धातू बनविण्याच्या पद्धती पूर्ववैदिकभाषात असत त्या पद्धती अशा : १) अय् गतौ धातू मूळ धातूला जोडून जोडधातू बनविण्याची एक पद्धत. २) इष् धातू मूळ धातूला लावून जोड धातू बनविण्याची दुसरी पद्धत. ३) तार् धातू मूळ धातूला जोडून जोड धातू बनविण्याची तिसरी पद्धत. ४) इष्य् धातू मूळ धातूला जोडून जोड धातू बनविण्याची चवथी पद्धत. या चारही जोड धातूंना दुहेरी धातू म्हटले असता चालेल. या दुहेरी धातूंना प्रत्यय येणेप्रमाणे लागत :

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries