संस्कृत भाषेचा उलगडा

२ दुहेरी जोड धातू
तुद् + अय् + आमि = तोदयामि
तुद् + इष् + अम् = तोदिषम्
नौ + इष् + आमि = नेषामि
हन् + तार् + मि = हन्तास्मि
हन् + इष्य् + आमि = हनिष्यामि
तोदय्, तोदिष्, नेष हे वस्तुत: दुहेरी धातू नसून तिहेरी धातू आहेत, हे पुढे दाखविण्यात येईल, परंतु सोयीकरिता त्यांची गणना येथे दुहेरी धातूंत केली आहे.

या दुहेरी धातू बनविण्याच्या पद्धती खेरीज साध्या धातूपासून अभ्यास नामक विकृतीने अभीक्ष्ण धातू बनविण्याची पद्धती असे, तिला अभ्यस्त पद्धती म्हटले असता वावगे होणार नाही. अभ्यस्त धातू येणेप्रमाणे बनत : १) एका पद्धतीत अभ्यास ऱ्हस्व असे व अभ्यस्ताचा गुण होई. २) दुसऱ्या पद्धतींत अभ्यास दीर्घ असे व अभ्यस्ताचा गुण होई. ३) तिसऱ्या पद्धतीत अभ्यास ऱ्हस्व असे व अभ्यस्त ऱ्हस्व किंवा दीर्घ होई. ४) चवथ्या पद्धतीत अभ्यास व अभ्यस्त या दोहोचा गुण किंवा वृद्धी होई. ५) पाचव्या पद्धतीत अभ्यास ऱ्हस्व राहून अभ्यस्ताचा गुण किंवा वृद्धी होई.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries