संस्कृत भाषेचा उलगडा

वद् हा मूळ धातू याला नुमागम किंवा नुकागम पूर्ववैदिक लोक नाना प्रकारे लावीत. नुमागम किंवा नुकागम म्हणजे अनुनासिक पूर्ववैदिक लोकांत कित्येक समाज अनुनासिक उच्चार प्राचुर्याने करीत व कित्येक समाज निरनुनासिक उच्चार प्राचुर्याने करीत. पैकी अनुनासिक उच्चार करणाऱ्यांच्या भाषांतून कित्येक भाषा वद् चा अनुनासिक उच्चार १) वन्द असा करीत, कित्येक २) वदन् असा करीत, ३) कित्येक वनद् असा करीत, ४) कित्येक वनेद् असा करीत, ५) कित्येक वद्ना, ६) कित्येक वद्नी, ७) कित्येक वेदनु, ८) कित्येक द्नो, असे अनुनासिक आठ प्रकारांनी धातूला यङ् किंवा यङ्लुक् चे रूप देताना जोडीत, पैकी वन्द्, वनद् व वनेद् ही अंगे रुधादि धातूंत आढळतात. वद्ना, वन्दौ व वन्द ही अंगें क्रयादि धातूंत आढळतात. वन्द् हे रूप भ्वादि व अदादि धातूंत येते आणि वन्दो व वदनु (वन्दव) ही अंगे स्वादि व तनादि धातूंत सापडतात. वनेद् हें अंग म्हणजे न हा आगम वस्तुत: एकट्या तृह् धातूंत आढळतो व त्याचा स्वतंत्र गण पाणिनीनें कल्पिला असता तर उत्तम व शास्त्रोक्त झाले असते. परंतु तसे न करता तूह्ं ची गणना पाणिनीने रुधादीं त करून तृणह इम् या सूत्राने तृणेहिभ हे रूप साधिले आहे. नु करता स्वादिगण व ना करिता क्रयादिगण जसा स्वतंत्र बनविला तसाच ने किंवा णे करता तृह चा स्वतंत्र गण बनविला पाहिजे होता. भ्वादि आणि अदादि धातूंत भेद एवढाच की भ्वादि धातूपुढे आमि, असि, अति अशी अजादि सर्वनामे लागतात व अदादि धातू पुढे मि, सि, ति इत्यादी अविरहित सर्वनामे लागतात. जसे,
वन्द् + मि = वन्दिम
वन्द् + आमि = वन्दामि
वन्द् + ति = वन्ति
वन्द् + अति = वन्दति

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries