संस्कृत भाषेचा उलगडा

२६ यत्, तद्, एतत्, अतत् (अदस्) हे सर्व शब्द तकारान्त आहेत असे पाणिनी म्हणतो. कारण समास वगैरेत यत्, तत् ह्न द् ही रूपे मूळ प्रातिपदिकाची येतात, जसे तत्कारण, यदिच्छा, इ. इ. इ. अन्यत् , कतरत्, इतरत् इत्यादी नपुंसकलिंगी प्रथमेच्या एकवचनाची रूपे यत्, तत्, इत्यादी सर्वनामांच्या रूपासारखी असलेली पाहून आणि समासात अन्य, इतर रूपे आलेली पाहून, पाणिनीला अदडडतरादिभ्य: पंचभ्य: हे सूत्र रचावे लागले, म्हणजे नपुंसकलिंगी प्रथमा व द्वितीया यांच्या एकवचनी अन्य, इतर, इत्यादी शब्दांना अद्ड म्हणजे अद् आदेश होतो असे सांगावे लागले. हा पाणिनीय रस्ता झाला. ऐतिहासिक रस्ता याहून निराळा आहे. पूर्ववैदिकभाषात अन्य व अन्यत्, इतर व इतरत्, त्य व त्यत्, त व तद् अशी भिन्न सर्वनामप्रातिपदिके होती असे ऐतिहासिक दृष्टीला दिसते. पैकी संमिश्र जी वैदिकभाषा व पाणिनीय भाषा तींत त व तद् या जोडीतील तद् हे प्रातिपदिक व समासक्षम समजले गेले आणि अन्य, अन्यत् या जोडीतील अन्य हे प्रातिपदिक व समासक्षम समजले गेले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries