मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३५.

श्री.
१६८८ वैशाख वद्य ७

तीर्थस्वरूप राजश्री गणेशभट दादा वडिलांचे सेवेशीं:-

अपत्यें दामोदरानें चरणांवर मस्तक ठेऊन सां नमस्कार विनंति येथील क्षेम ता. वैशाख वा ७ मंदवार, मुक्काम पुणें, सुखरूप असों, विशेष. आपणांकडून बहुत दिवस पत्र येऊन सविस्तर वर्तमान कळों येत नाहीं. तरी ऐसें न करावें. 'सदैव पत्र पाठवून सांभाळ करीत जावें. यानंतरीं येथून हुंडी साडे तेरा रुपयांची मुंजावर केली आहे. त्यास मुंजाकडून साडे तेरा रुपये घेऊन वो बाळोपाध्ये हर्डीकर खिणगिणी यांस पावते करावे. पूर्वी माणसाबरोबर पत्र पाठविलें तें पावलें. शरीरास समाधान नाहीं ह्मणोन माणसानें सांगितले. त्यास, औषधीउपाय करून शरीरास आरोग्य होय तें करावें. इकडील वर्तमान तरी, श्रीमंत राजश्री दादा हिंदुस्तानांत नर्मदा उतरोन गेले. बळवंतराव थोरले श्रीमंतांसमागमें पुण्यास आले, श्रीमंत राजश्री तात्या वडील माणसें सर्व सुखरूप आहेत. कळावें ह्मणोन लिहिलें आहे. येजमानाविशीं देवास प्रार्थना करीत जावी. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा, है विनति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries