मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३७

श्री.
१६८८ आषाढ वा ३

राजश्री आनंदराव धुळप गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधव बल्लाळ प्रधान अशिर्वाद. सुरसन सबासितैन मया व अलफ. विठ्ठलराम कुळकर्णी मौजे केळवली ता सौंदळ यांणीं विदित केलें कीं, मौजे मजकूरची खोती कृष्णप्रभु देसाई, ता मजकूर यांजकडे आहे. त्यांणी गांवचीं भुतें आह्मांवर घातलीं. त्यामुळें आपला नाश बहुत जाहाला तेव्हां आनंदराव धुळप यांणीं त्याचें व आमचें वर्तमान मनास आणून, गांवकरी यांचे गुजारतीनें भुतें आपणावरी देसाई यांनी घातलीं हें खरें जाहालें ! त्याप्रमाणें भुतें वारा ( वया) विसीं देसाई यांणीं कतबा दिल्हा. परंतु मुदतीस वारलीं नाहीं ! आणि बाळाजी कृष्ण माईणकर यास देसाई यांणीं खोती सांगितली. त्याजवर मागती पडधळे बाळानें, भुतें देसाई यांचे शद्वें पडलीं. ऐसें निवडलें ! त्याप्रमाणें वारितों ह्मणून बाळाजी कृष्ण माईणकर यानें कबूल केलें. परंतु वारिलीं नाहीं ! आह्मांस भुतें उपद्रव करितात ! त्यास येविसींची आज्ञा करावी. ह्मणोन, त्याजवरून, तुह्मांस पत्र सादर केलें असे. तरी कृष्ण-प्रभु देसाई, बाळाजी कृष्ण यांस व त्याचे कजाचे कागद तुह्मांपाशीं असतील ते हुजूर पाठविणें हरदु वादियांचे वर्तमान मनास आणून ज्याकडे अपराध लागेल त्याचें पारिपत्य केलें जाईल. जाणिजे. छ १६ सफर, बहुत काय लिहिणें ?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries