मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४३

श्री.
१६८८ भाद्रपद शुद्ध ७

चिरंजीव राजश्री राव यांसी रघुनाथ बाजीराव आशीर्वाद. उरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. श्री गोकर्ण महाबळेश्वर व श्री स्वामी कार्तिक यांचे पुजानैवेद्यास वगैरे खचीस पांच हजार होनाचे गांव द्यावे ऐसा हैदर नाईक यांणी पेशजी करार केला होता. परंतु त्यांणीं कराराप्रमाणें गांव दिले नाहींत. पांच हजार रुपयाचें मात्र गांव, इकडून रा रघुनाथ शामजी कारकून पाठविले आहेत, त्याचे स्वाधीन केले, ह्मणोन कळोन आलें, ऐशियास, आपण हैदर नाईकास पत्रें पाठवन कराराप्रमाणें पांच हजार होनाचे गांव कारकुनाचे स्वाधीन करीत तें करावें. येविसीं ताकीदपत्रें लागतील तीं वो रा व्यंकटशास्त्री यांस द्यावीं. रा छ ६ रबिलाखर, बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries