मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४७.

पो जेष्ठ वद्य ५ शनीवार
श्रीशंकर
१६९० ज्येष्ठ वद्य २

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी कृष्णराव बल्लाळ कृतानेक सां विनंति उपरी येथील कुशल ता जेष्ठ वद्य २ पावेतों आपले कृपेंकरून सुखरूप असों. विशेष. कृपा करून पत्र पार तें पावलें. रा सदाशीव रामचंद्र याची बातनी व राजाराम पंत यांचे वर्तमान कळलें व श्रीमंतांस आपण पत्र लिहिलें होतें त्याचें उत्तर घेऊन पा आहे. आपण लिहिले की, आह्मांस विचार काय लिा तो लिहावा. त्यास आपण उभय पक्षीं मान्य. कोणी कडूनही उपसर्ग लागणार नाहीं स्वस्थ असावें. आज श्रीमंताचा मुकाम घांटावर आहे. उदईक कूच करून घांटाखालीं वोकरी इतकें पाणी पाहून मुकाम होईल. लौकरीच गंगेवर टोकें तीन कोस पूर्वेस टाकून मुकाम होणार आहे. तेव्हां आपणासहि विदित होईल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries